हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून कोरोना संकटकाळात रक्तदान, प्लाझ्मा दान करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:47+5:302021-05-03T04:13:47+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांचे रक्त सांडले, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून, कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकट काळात रक्तदान ...
अकोला : महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांचे रक्त सांडले, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून, कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकट काळात रक्तदान व प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवार, १ मे रोजी केले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताद्वारे मानवंदना देऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
................................फोटो..........................................