या नभाने या भुईला दान द्यावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:38+5:302021-09-18T04:20:38+5:30
या नभाने, या भुईला दान द्यावे... आणि मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येतील फळाला, जाेंधळ्याला चांदणे लगडून जावे, असे ...
या नभाने, या भुईला दान द्यावे... आणि मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येतील फळाला, जाेंधळ्याला चांदणे लगडून जावे, असे प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांनी म्हटले आहे. सहृदयी समाजाने या कुटुंबाच्या मदतीला धाऊन यावे. असे आवाहन शेलू वेताळबाबा संस्थानचे अध्यक्ष राजू सदार यांनी केले आहे.
दोन दिवसापूर्वी
कारंजा - मानोरा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शहरातील सर्पमित्र संजय दोड हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी विद्या व मुलगा पार्थ दोड गंभीर जखमी झाले. नऊवर्षीय पार्थला गंभीर दुखापत झाली असून, तो अत्यवस्थ आहे. त्याला अकोल्यात खासगी रुग्णालयात भरती केले आहे. त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे.
मुक्या प्राण्यांना जीवनदान देणाऱ्याचे कुटुंब संकटात
मुक्या प्राण्यांना जीवनदान देणारा मूर्तिजापूर येथील सर्पमित्र संजय दोड यांच्यावर तर नियतीने घाला घातला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. परिवाराच्या उपजीविकेसाठी संजय दोड यांनी पान सेंटरचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी कधीही मुक्याप्राण्यांच्या सेवेसाठी पैसे घेतले नाहीत. सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी रस्त्यावरील मुक्या प्राण्यांवर उपचार केले. आतापर्यंत त्याने जवळपास हजाराच्यावर सापांना जीवनदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने त्याचा परिवार उघड्यावर आला आहे. संकटकाळात धावून येणाऱ्या संजयच्या परिवारावर अशी वेळ आली. त्याची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी लागणारे पैसे कमी पडतील म्हणून मित्रमंडळीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.