'त्या' रस्त्यासाठी गाढवाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:46+5:302021-02-05T06:12:46+5:30
परंतु उदासीन लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही. अखेर हिरपूर येथील रहिवासी व हमचालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जि.प. ...
परंतु उदासीन लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही. अखेर हिरपूर येथील रहिवासी व हमचालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य बबनराव डाबेराव यांनी प्रजासत्ताक दिनापासून गाढवासह धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवून याची माहिती संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांना दिली. याची दखल घेत दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे यांनी तत्काळ आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन करणाऱ्यांची समजूत घातली. आंदोलन स्थळावरूनच संबंधित मंत्र्यांनी माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्र्यांनी रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याचे कबूल केले. दुपारी धरणे आंदोलनास तूर्तास स्थगित करण्यात आले. यावेळी हमचालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव, तालुकाध्यक्ष रोहित सोळंके, ता. सचिव किशोर सोनोने, पंचायत समिती उपसभापती सुभाष राऊत, बंडू डाखोरे, मुरली मुगल, बाळासाहेब बाजड, डॉ. वानखडे, दिनेश दुबे, शहाबुद्दीन, दीपक खंडारे, अकबर ठेकेदार, नागोराव तायडे, रवींद्र ठाकरे, कुलदिश शंकर अवघड, जि.आर. चुके, नितीन पाटील काळे, राजू जोगदंड, गोपाळराव काळे, समाधान इंगळे, सागर कोरडे, प्रदीप ननिर, राम कोरडे, कन्हैया कनोजे राजेश्वर गाडेकर आदी उपस्थित होते.
फोटो: