‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. राजकुमार चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:03 PM2020-02-09T12:03:25+5:302020-02-09T12:03:29+5:30

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...

Don't be afraid of 'Corona'; But be careful! - Dr. Rajkumar Chavhan | ‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. राजकुमार चव्हाण  

‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. राजकुमार चव्हाण  

googlenewsNext

अकोला : चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून, हजारो लोक यापासून प्रभावित झाले आहेत. यावर अद्यापही औषध उपलब्ध नसल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील काही विद्यार्थी आणि व्यापारी गत काही दिवसांपूर्वी परतल्याने आपल्यालाही कोरोनाचा धोका तर नाही ना, अशी भीती अनेकांना सतावते आहे. या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...

कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो, याबाबत अजूनही निश्चित सांगता येत नाही; मात्र सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे, शिंकण्यातून, खोकल्यातून बाहेर पडणाºया थेंबाद्वारे कोरोना विषाणू पसरतो. 

कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लागण कोणालाच झालेली नाही; परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय करावे.
श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तींनी संसर्गापासून सावध राहावे.
हात वारंवार धुवावे
शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा
अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस खाऊ नये
फळे, भाज्या न धुता खाऊ नये

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? 
कोरोना व्हायरसची लागण झाल्यास साधारणत: सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून येतात. ही सामान्य लक्षणे असली, तरी श्वसनास त्रास होणाºया व्यक्तींनी हा त्रास कशामुळे होत आहे, हे स्पष्ट होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना बाधित देशात प्रवास केलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?
कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. येथे रुग्णांची स्क्रिनिंग केली जाणार आहे. लक्षणे आढळताच रुग्णाचे नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली आहे. तोपर्यंत रुग्णांना अ‍ॅन्टिबायोटीक औषधोपचार केला जाणार आहे. 

कोरोनाची लक्षणे काय?
कोरोनाची लक्षणे मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे आदी लक्षणे दिसून येतात.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या तरी जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाय योजनांची गरज आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

Web Title: Don't be afraid of 'Corona'; But be careful! - Dr. Rajkumar Chavhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.