पीक कर्जासाठी हमिपत्राची सक्ती करू नका! - जिल्हाधिकाऱ्यांचे  बँकांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:21 PM2020-05-19T17:21:56+5:302020-05-19T17:22:13+5:30

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील बँकांना दिले.

 Don't force a guarantee for a crop loan! - Collector's instructions to banks | पीक कर्जासाठी हमिपत्राची सक्ती करू नका! - जिल्हाधिकाऱ्यांचे  बँकांना निर्देश

पीक कर्जासाठी हमिपत्राची सक्ती करू नका! - जिल्हाधिकाऱ्यांचे  बँकांना निर्देश

googlenewsNext

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाउन’ आणि संचारबंदीच्या काळात कर्ज घेणाºया शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या पाठवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्याची सक्ती करू नये तसेच जिल्ह्यातील कोणताही शेतकरीपीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील बँकांना दिले.
‘लॉकडाउन' कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुद्रांक अधिनियम कलम १७ नुसार आवश्यक दस्ताचे शुल्क लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर व कामकाज सुरू झाल्यावर भरले तरी, ते मुदतीत भरल्याचे मानले जाते. अशाही परिस्थितीत मिल्क भरणे शक्य नसल्यास कलम ४० प्रमाणे अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८९ नुसार गहाण व कर्ज व्यवहारात ३० दिवसांच्या आत व्यवहाराचे दस्त जमा करणे आवश्यक आहे. तथापि, ३० दिवसांची कालमर्यादा कार्यालय बंद असल्याच्या कालावधीत संपुष्टात आली असल्यास लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर म्हणजेच कार्यालय पूर्ववत सुरू झाल्यावर दस्त जमा करता येतील. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जासाठी येणाºया शेतकºयांकडून १०० रुपयांच्या व त्यापेक्षा अधिक रकमेच्या हमीपत्राची सक्ती करू नये आणि जिल्ह्यातील मात्र सर्व शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील बँकांना दिले आहेत.

 

Web Title:  Don't force a guarantee for a crop loan! - Collector's instructions to banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.