घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:52+5:302021-05-13T04:18:52+5:30

म्हणून लोक चाचणी टाळतात. लक्षणे असूनही अनेक जण अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने चाचणी टाळतात. पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबापासून दहा दिवस ...

Don't panic; Corona can be overcome with proper care! | घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!

घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!

Next

म्हणून लोक चाचणी टाळतात. लक्षणे असूनही अनेक जण अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने चाचणी टाळतात.

पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबापासून दहा दिवस दूर राहण्याची चिंता.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात राहावे लागणार.

कुटुंबातील इतर सदस्यांना काही झाले तर.

तर तुम्ही कोरोनाची साखळी तोडू शकता.

वेळीच चाचणी केल्यास कोविडचे निदान शक्य.

निदान होताच, स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवून कोविडचा संसर्ग रोखता येतो.

तुमच्या संपर्कातील इतरही लोक चाचणी करून कोरोनाचा फैलाव रोखू शकतात.

पहिले दहा दिवस महत्त्वाचे

कोरोनाची लागण झाल्यास पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत.

पहिल्या तीन दिवसांतच रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो.

साध्या औषधोपचारानेच रुग्ण बरा होऊ शकतो.

जनजागृतीची गरज

रुग्णाला कोविडचा संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला असून, स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करायला हवे, कोरोनापासून कसे सुरक्षित राहता येईल, तसेच प्रकृती अत्यवस्थ होण्यापूर्वीच नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.

कोरोनाचे अर्ली डिटेक्शन झाल्यास रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्ण कमी वेळेत बरा होऊ शकतो, शिवाय त्याच्यापासून इतरांपर्यंत कोरोनाचा फैलाव रोखणेही शक्य होते.

- डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन, जीएमसी, अकोला

Web Title: Don't panic; Corona can be overcome with proper care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.