कोरोना व्हायरसला घाबरू नका; पण सतर्क राहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:33 PM2020-03-05T17:33:49+5:302020-03-05T17:34:01+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना आयसोलेट वॉर्ड तसेच उपलब्ध सुविधांविषयी आढावा घेतला.
अकोला : राज्यात अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला त्यामुळे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही; परंतु सतर्कता आणि सावधगिरी बाळगणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आजाराची लक्षणे दिसताच त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
कोरोना व्हायरससंदर्भात गुरुवार ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मपापालिका आयुक्त संजय कापडणीस, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक शेख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना आयसोलेट वॉर्ड तसेच उपलब्ध सुविधांविषयी आढावा घेतला. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी त्यांनी आरोग्याला आवाहन केले.
हे करा
- नियमित स्वच्छ हात धुवावे
- शिंकताना व खोकलताना नाकावर व तोंडावर रूमाल धरावा
- सर्दी किंवा तापीचे लक्षण आढळताच सर्वोपचार रुग्णालयात दाखवा
- आजारी रुग्णांशी संपर्क साधावा
- जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा
- मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून उकडून खावीत
- गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून स्वत:चा बचाव करा
ही आहेत लक्षणे
- सर्दी, खोकला, घसा बसणे
- गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे
- श्वास घेण्यास त्रास होणे, श्वासात अडथळा
- अचानक तीव्र ताप
- न्यूमोनियाची लक्षणे
- काही रुग्णांना मूत्रपिंड निकामी होणे
- प्रतिकारशक्तीची कमतरता, असलेल्या व्यक्तींत असामान्य लक्षणे
- रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता वाटणे
- अतिसार- पचनसंस्था बिघाडाची लक्षणे
- रुग्णांना अति थकवा जाणवतो, त्यामुळे अशक्तपणा येतो