काळजी करू नका, पूर्ण नुकसान भरपाई देऊ; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:00 PM2019-11-03T13:00:39+5:302019-11-03T13:15:46+5:30
पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अकोला जिल्ह्याच्या दौºयावर आले होते.
अकोला : अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असले, तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये, झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना दिली. अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अकोला जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी म्हैसपूर, कापशी व चिखलगाव येथील शेतकºयांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी बाधीत शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. तुम्हीच आमचे मायबाप आहात....एवढे नुकसान झाल्यावर तुम्हीच सांगा आता आम्ही कसे जगायचे, असा टाहोच शेतकºयांनी फोडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांना धीर देत नुकसानाची पूर्ण भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.