पिकाची दुबार पेरणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:11+5:302021-06-19T04:14:11+5:30
पातूर : तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर ...
पातूर : तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
गर्दी कमी तरी बॅरिकेड्स कायम
अकोट : शहरात कोरोनाचा संसर्ग पाहता मुख्य मार्गावर शिवाजी चौकापासून सोनू चौकापर्यंत बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता निर्बंध शिथिल झाले आहे. शेतातील कामे सुरू असल्याने शहरातही गर्दी कमी दिसून येत आहे तरी हे बॅरिकेड्स हटविण्यात आले नाही.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
पातूर : परिसरात शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांची पेरणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे उर्वरित पेरण्या होणार आहेत.
खरिपाच्या पेरणीला आलाय वेग
बाळापूर : परिसरात गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला असून, चोहीकडे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. परंतु काही भागांत पाऊस अद्यापही न आल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे.