चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून जीवे मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:07 PM2020-05-11T12:07:29+5:302020-05-11T14:44:08+5:30

पत्नीवर असलेल्या संशयातून त्याने सोमवारच्या पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जिजा हिला खलबत्त्याने ठेचून मारले.

Doubt on character; The husband crushed his wife to death | चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून जीवे मारले

चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून जीवे मारले

googlenewsNext

आलेगाव (अकोला) : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या आलेगाव येथे एका पतीने त्याच्या पत्नीची बत्त्याने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा जीव घेतल्याचे सांगण्यात येत असले, तरी नेमक कारण पोलिस तपासात समोर येईल. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोहर भिका मेटांगे असे या कृरकर्मा पतीचे नाव असून, हे कृत्य केल्यानंतर त्याने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला.

मेहकर तालुक्यातील जनुना येथील एक कुटुंब आलेगाव येथील गोरक्षण मध्ये वास्तव्यास होते. मनोहर भिका मेटांगे व जिजा मनोहर मेटांगे असे या जोडप्याचे नाव आहे. मनोहर भिका मेटांगे याचे त्याची पत्नी जीजा मनोहर मेटांगे (२५) हिच्यासोबत वाद होता. प्राप्त माहितीनुसार, पत्नीवर असलेल्या संशयातून त्याने रविवार व सोमवारच्या रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास जिजा हिला खलबत्त्याने ठेचून मारले. यावेळी आठ वर्षाची मुलगी घरात होती. तिने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले. जिजाचा खून केल्यानंतर मनोहर ने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीचा अत्यंत भेदरलेला आवाज व आरडाओरड ऐकून काहीतरी अघटीत घडले याचा अंदाज आल्याने शेजारी नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला. आठ वर्षाच्या मुलीसह दोन वर्षाच्या मुलाला नागरिकांनी बाहेर काढले व पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंके. ठाणेदार गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, गजानन पोटे, देवेंद्र चव्हाण, बालाजी सानप, अमोल कांबळे, सुनील भाकरे, घटनास्थळी पोहोचले. ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले, त्यांनीही तपासणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोच्च रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. पती मनोहर हिरामण मेटांगे याने पत्नीची हत्या करून स्वतः डोक्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तोही जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविण्यात आले आहे. आरोपी मनोहर हिरामण मेटांगे ३५ यांच्याविरुद्ध भादविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  उपनिरीक्षक रामराव राठोड करीत आहे. याप्रकरणी बाळापूरचे एसडीपीओ रोहिणी सोळंके यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली आहे.

Web Title: Doubt on character; The husband crushed his wife to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.