डीपीसी, अंधारेंचा पत्ता कट, विजय देशमुखांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:47+5:302021-09-17T04:23:47+5:30
अकाेला : नियाेजन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अखेर मुहूर्त शाेधत २६ ऑगस्ट राेजी नियाेजन समितीवरील नामनिर्देशित व विशेष ...
अकाेला : नियाेजन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अखेर मुहूर्त शाेधत २६ ऑगस्ट राेजी नियाेजन समितीवरील नामनिर्देशित व विशेष आमंत्रित सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने प्रसिद्ध केले हाेते. हे आदेश जिल्हाभरात व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रसारितही झाले. मात्र, तासाभरातच राज्य शासनाच्या संकेतस्थळावरून आदेश हटविण्यात आले हाेते. त्यामुळेच समिती सदस्यांच्या निवडीत राजकारण झाल्याची चर्चा हाेती ती खरी ठरली आहे. समितीमध्ये राष्ट्रवादीच्या काेट्यातून कृष्णा अंधारे यांच्याऐवजी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचे नाव अंतिम झाले आहे.
नियाेजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांमध्ये बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख तसेच विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार अमाेल मिटकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये काँग्रेसचे डाॅ. पुरुषाेत्तम दातकर, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव तथा गाेविंदप्रसाद चाैधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रहारचे माजी जिल्हा संघटक राजेंद्र खाराेडे, प्रहारचे महानगर अध्यक्ष मनाेज पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते गाेपाल दातकर, शिवसेनेचे अकाेला पूर्व शहर प्रमुख राजेश मिश्रा, उमेश जाधव यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीत कुरघाेडीचे राजकारण
नियाेजन समितीवर शिफारस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह एक नाव अकाेला महानगरमधून घेण्यात आले हाेते. मात्र, पक्षाकडे प्रतिष्ठा करून वेळेवर नाव बदलण्यात आल्याची चर्चा हाेती. ही या निमित्ताने खरी ठरली आहे. राष्ट्रवादीच्या काेट्यातील नाव बदलामुळे पक्षातील कुरघाेडीचे राजकारण पुन्हा एकदा समाेर आले आहे.