२५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

By admin | Published: September 14, 2016 02:16 AM2016-09-14T02:16:51+5:302016-09-14T02:16:51+5:30

अकोला मनपाच्या हद्दवाढीमुळे समाविष्ट गावांचे सर्वेक्षण होणार.

DPR will be changed for 254 crore water supply scheme | २५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

२५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

Next

आशिष गावंडे
अकोला, दि. १३: अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. आता मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहरालगतच्या २४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे केला जाईल.
संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने अमृत योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने शहराची पाणीपुरवठा योजना गृहित धरून २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर तयार केला. मुख्य अभियंता कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर सदर प्रकल्प अहवाल मजीप्राच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात आला. यादरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी शासनाने मनपाच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. साहजिकच, मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्येदेखील अमृत योजनेतून पाणीपुरवठय़ाच्या वितरण प्रणालीत सुधारणा करावी लागणार आहे. त्यानुषंगाने मजीप्राने तयार केलेल्या डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे.

मनपासमोर वान धरणाचा पर्याय
२0११ च्या जनगणनेनुसार शहरालगतच्या २४ गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजार असून, यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये किमान ४0 ते ५0 हजारांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येकी १३५ लीटर पाणीपुरवठा केला जाईल. २४ गावे आणि शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो.

२५ टक्के हिस्सा जमा करावा लागेल

पाणीपुरवठा योजनेच्या एकूण कि मतीमध्ये २५ टक्के रकमेचा हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागेल. ही रक्कम टप्प्याटप्प्यानुसार जमा केली जाणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

मनपाकडून घेणार 'डाटा'
मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाने जमा केली आहे. ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतली जाईल. त्यानंतर २४ गावांत सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.

Web Title: DPR will be changed for 254 crore water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.