डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:54+5:302021-07-04T04:13:54+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायब्रीड मोडमध्ये म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आयोजित ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायब्रीड मोडमध्ये म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमात आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. अमोल मिटकरी, गणेश कंडारकर, मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, विनायक सरनाईक, स्नेहा हरडे, डॉ. चारुदत्त मायी आभासी पद्धतीने उपस्थित होते. सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्याला नुकतेच सेवानिवृत्त झालेले संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यान विद्या डॉ. प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांची सभागृहात उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.