डॉ.आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना: ५ ऑगस्टपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:32 PM2019-07-30T18:32:27+5:302019-07-30T18:32:49+5:30
अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये राबविण्यासाठी शासनाने ...
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पंचायत समितीस्तरावर नविन विहीर व इतर बाबी करीता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. कृषि आयुक्तालय पुणे स्तरावरून सदर योजने करीता ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. योजने अंतर्गत अर्ज संबंधीत अर्जदारांकडुन ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत , साईट सुरू झाल्यापासुन एक महिन्या पर्यंत देण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी पंचायत समितीस्तरावरील कृषि अधिकारी (विघयो) यांचेशी संपर्क साधून सोमवार दि.5 ऑगष्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करणेसाठी www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नविन युजर येथे नोंदणी करून संपुर्ण माहिती व आवश्यक दस्तावेज अपलोड करावे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढुन त्यावर अर्जदाराने स्वाक्षरी करावी व ऑनलाईन जोडलेले सर्व मुळ दस्तावेज पंचायत समिती कार्यालयात कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडे सादर करावे. या योजनेत जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद , अकोला यांनी केले आहे.