डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियानातून स्पर्धा परीक्षेचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:31 PM2020-02-10T14:31:07+5:302020-02-10T14:31:12+5:30
जिल्ह्यातील ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे देण्याचा अभिनव उपक्रम रविवार, ९ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आला आहे.
- संतोष येलकर
अकोला: प्रशासनात जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा, यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे देण्याचा अभिनव उपक्रम रविवार, ९ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) विविध पदांसाठी घेण्यात येणाºया स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज तीन तज्ज्ञांमार्फत स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. निवड करण्यात आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेपर्यंत नियमित मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होतील, यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
गरीब कुटुंबातील
विद्यार्थ्यांचा समावेश!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियानात स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज तज्ज्ञांमार्फत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेपर्यंत दररोज तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येण्यात येणार आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.