डॉ. पंजाबराव देशमुख जयंती उत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:30+5:302020-12-30T04:25:30+5:30
तेल्हारा : येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा येथे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती ...
तेल्हारा : येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा येथे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. त्यात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन व कार्य यावर आधारित प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले हाेते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आजीवन सभासद पुरुषोत्तम दहे व त्र्यंबकराव चोपडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी प्रा. डॉ. कृष्णा माहुरे यांनी केले, तर प्रा. डॉ. धीरजकुमार नजान यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. ढाेले यांनी विविध स्पर्धांत विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन डॉ. एम.के. नन्नावरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. आर.व्ही. लोणकर, प्रा. एम.पी. चोपडे, प्रा. एम.एम. कवरके, डॉ. जी.ओ. जोंधळेकर व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.