अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 10:59 AM2022-04-19T10:59:19+5:302022-04-19T10:59:37+5:30
Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker : वयाच्या ८२ व्या वर्षातही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे.
अकोला : येथील जुन्या काळातील ख्यातनाम डॉक्टर व माहेश्वरी समाजाच्या नवीन पिढीला आदर्श असलेले डॉ.एन.के. माहेश्वरी यांचा राजस्थानातील कोटा येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा कामगिरी व वयाच्या ८२ व्या वर्षात ही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे. अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्र व माहेश्वरी समाजासाठी ही भुषणावह बाब आहे.
राजस्थान येथील कोटा येथे आयोजित ‘आरोग्यम ‘ कार्यक्रमात अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्षा आशा माहेश्वरी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक सारडा यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या प्रत्येक आयोजित कार्यक्रमात डॉ. माहेश्वरी वैद्यकीय सेवा देवून आपल्या कर्तृत्वाचे पालन करतात. डॉ. माहेश्वरी यांच्या सन्मानाने अकोला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.