वृद्ध कामगारांना उपदानाची रक्कम विद्यापीठाने द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:59 PM2020-02-10T14:59:26+5:302020-02-10T14:59:31+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पाच वृद्ध कामगारांना उपदानाची (ग्रॅज्युटी) रक्कम देण्याचा आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायधीश ए. डी. बोस यांनी दिला.

DR. PDKV should pay subsidy to older workers! |  वृद्ध कामगारांना उपदानाची रक्कम विद्यापीठाने द्यावी!

 वृद्ध कामगारांना उपदानाची रक्कम विद्यापीठाने द्यावी!

Next

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पाच वृद्ध कामगारांना उपदानाची (ग्रॅज्युटी) रक्कम देण्याचा आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायधीश ए. डी. बोस यांनी दिला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथे १९७२ पासून वर्षानुवर्षे काम करू न नवीन वाण शोधण्याची शेतीची कामे केली जातात; परंतु कामगारांचे वय झाल्याने वयाचे ६० वर्षे पूर्ण केल्यावर सेवानिवृत्तीच्या नावाखाली पाच कामगारांना बंद केले होते; परंतु कामगारांना उपदानाची रक्कम कायद्याप्रमाणे देण्यात आली नाही. या कामगारांना उपदानाचा कायदा लागू आहे. त्याचप्रमाणे उपदानाची रक्कम कामगारांना देणे आवश्यक होते. उपदान देण्यासंबंधी अनेक वेळा कामगारांनी आंदोलने केली; परंतु कामगारांना उपदानाचे पैसे मिळाले नाही. यासाठी कामगारांनी युनियनकडे धाव घेतली. यासंदर्भात लाल बावटा युनियनच्यावतीने प्राधिकरण व कामगार न्यायालय अकोला येथे अनेक कामगारांचे प्रकरण दाखल करण्यात आले. यामध्ये सखुबाई शिरसाट (२९,०३२ रुपये), गोकर्णा दामोदर (३३,७७७ रुपये), हिरू बाई शामकुंवर (५२,२९५ रुपये), सुमन वानखडे (८७,२६५ रुपये), शकुंतला गावंडे (८२,०५५ रुपये) यांच्या प्रकरणावर निकाल देण्यात आला आहे. कामगारांच्या उपदानाची रक्कम २०१७ पासून प्राप्त होईपर्यंत दहा टक्के व्याजासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने द्यावी, असा आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश ए. डी. बोस यांनी दिला आहे.

 

Web Title: DR. PDKV should pay subsidy to older workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.