डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा माती परीक्षणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:57 PM2019-04-30T13:57:08+5:302019-04-30T13:59:39+5:30
माती परीक्षण करणे गरजेचे असल्याने यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने माती परीक्षणावर भर दिला आहे.
अकोला: भरघोस उत्पादनासाठी मातीचा सामू बघून पिकांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असल्याने यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने माती परीक्षणावर भर दिला आहे. कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात कृषी विद्यापीठ विदर्भातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती विकासासाठीचे प्रोत्साहन देणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वत:च शेतात जाऊन मातीचे नमुने घ्यायचे आणि या नमुन्याचे परीक्षण झाल्यानंतर ते थेट शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा अभिनव निर्णय राबविला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात यावर पुन्हा भर देण्यात आला आहे. माती हा शेतकºयांचा जिव्हाळ््याचा प्रश्न आहे. या मातीत सोळा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत; पण शेतीचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याचे प्रत्येक पावसाळ््यात शेतातील माती आणि त्यासोबतच १६ सूक्ष्म अन्न द्रव्य वाहून जात असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याने कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने शेताची बांधबधिस्ती करण्याचे काही नवे तंत्रज्ञान शेतकºयांना सांगितले आहेत. उताराला आडवी पेरणी, कंटुर, गादी वाफा पद्धतीने शेती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संकल्पनेतील अनुुभवातून शिक्षण उपक्रमांतर्गत या कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी थेट बांधावर जाऊन माती व पाणी परीक्षण मागील दोन तीन वर्षात करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी ‘समृद्धी रथ’ तयार केला होता. विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन माती परीक्षणाचे नमुने घेतले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वत: मातीचे प्रयोग शाळेत पृथक्करण करू न परीक्षणाचे अहवाल शेतकºयांच्या घरी पोहचून दिले. यावर्षी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी, शास्त्रज्ञ घरोघरी जाऊन शेतकºयांना शाश्वत शेतीसाठीची माहिती देत आहेत. कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, संशोधन शेतकºयांना समजावून सांगण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाच्यावतीने येत्या महिन्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा घेण्यात येणार असून, शेतकºयांना विविध पिकांचे नियोजन व त्यांच्या शंकाचे निरसण केले जाणार आहे.
माती परीक्षणावर आमचा भर असून, शेतकºयांना माहिती दिली जात आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात विद्यार्थी, शास्त्रज्ञ विदर्भातील गावागावा जाऊन शेतकºयांना मार्गदर्शत करीत आहे.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.