डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील रँकिंगमध्ये भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 08:15 PM2020-12-08T20:15:06+5:302020-12-08T20:18:00+5:30
Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University १० अंकांनी झेप घेत गतवर्षीच्या ४८ व्या क्रमांकावरून ३८ व्या स्थानी बाजी मारली आहे.
अकोला : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारा वर्ष २०१९ चा आयसीएआर मानांकन (रँकिंग) अहवाल जाहीर करण्यात आला असून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १० अंकांनी झेप घेत गतवर्षीच्या ४८ व्या क्रमांकावरून ३८ व्या स्थानी बाजी मारली आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारे जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९२०१९ या कालावधीसाठी देशांतर्गत कृषि विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, विविध पुरस्कार, संशोधनात्मक लेख, वार्षिक बजेट, पदभरती, प्रायोजित प्रकल्प, आदीं सह विविध विषयांवर केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. गत वर्षी मानांकनातील उणिवा, त्रुट्या, सादरीकरणाची पद्धती यावर सारासार विचार करीत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठ स्तरावर रँकिंग समिती स्थापन केली होती. विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेले या समितीमध्ये प्रा डॉ. नितीन कोष्टी, प्रा नितीन गुप्ता, प्रा.डॉ.अजय सदावर्ते, प्रा.डॉ.श्रीकांत ब्राह्मणकर, प्रा.डॉ. निरज सातपुते,प्रा. डॉ. मंगेश मोहरील यांचा समावेश होता. विद्यापीठाचे आयसीएआर नोडल ऑफिसर डॉ. शशांक भराड सदस्य सचिव असलेल्या या समितीने संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रातील कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्रे,कृषी विज्ञान केंद्रे, यासह विषयवार विभागांच्या तयारीचा ढाचा तयार केला होता. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे संचालक संशोधन प्रा डॉ विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण प्रा.डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता उद्यांनविद्या प्रा.डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी प्रा.डॉ. सुधीर वडतकर यांचेसह सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अतिशय अल्प कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने कामगिरी बजावत हे उद्दिष्ट साध्य केले. या संपूर्ण प्रक्रियेत नोडल ऑफिसर प्रा.डॉ.शशांक भराड यांनी सर्वच स्तरावर निरंतर पाठपुरावा केला आणि त्यांचे कार्यालयातील सहकारी डॉ अतुल वराडे, श्री. सचिन पाटील, यांनी सहकार्य केले. कुलगुरू डॉ विलास भाले यांनी या यशाबद्दल विद्यापीठ परिवारातील सर्व संचालक अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, कुलसचिव, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र अधिकारी,विद्यापीठ ग्रंथपाल,नियंत्रक, अभियंता, यांचेसह सर्वच अधिकारी-कर्मचारी, कामगार, विद्यार्थी आदि सर्वांचे अभिनंदन केले आहेण