डॉ. उदय नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:04 IST2020-09-23T11:04:35+5:302020-09-23T11:04:45+5:30
बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

डॉ. उदय नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अकोला : शहरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. उदय नाईक यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच डॉ. नाईक यांनी कोरोनाची लागण झाली होती. एका खासगी इस्पितळात कोरोनाशी झुंज सुरु असतानाच बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.
डॉ. नाईक यांच्या संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे त्यांच्या पत्नी भावना नाईक यांचा १२ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा डॉ. मानस नाईक यांनी कोरोनावर मात केली. तथापी, डॉ. नाईक यांची कोरोनाशी झुंज सुरुच होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती व ते उपचारांना दादही देत होते. दरम्यान, बुधवारी पहाटे १.३० वाजताचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.