डॉ . विनय दांदळे राज्यस्तरीय शब्दसृष्टी साहित्य पुरस्काराने सन्मानित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:15 PM2020-02-03T12:15:11+5:302020-02-03T12:15:16+5:30

प्रथितयश डॉ. नितेश खोंडे यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

Dr. Vinay Dandale Awarded the State Level Glossary Literature Award | डॉ . विनय दांदळे राज्यस्तरीय शब्दसृष्टी साहित्य पुरस्काराने सन्मानित 

डॉ . विनय दांदळे राज्यस्तरीय शब्दसृष्टी साहित्य पुरस्काराने सन्मानित 

googlenewsNext

अकोला : साद बहुद्देशीय संस्था अकोला चे संस्थापक अध्यक्ष तथा सुपरिचित साहित्यिक डॉ. विनय दांदळे यांना रविवा 2 फेब्रुवारी 2020 रोजी वाशीम येथील एस. एम. सी. च्या सभागृहात पार पडलेल्या ४ थ्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य सम्मेलनात राज्यस्तरीय शब्दसृष्टी साहित्य रत्न वाड्मय पुरस्कार प्रमुख अतिथी नागपूर येथील प्रथितयश डॉ. नितेश खोंडे यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . ह्यावेळी संमेलनाध्यक्ष नांदेड येथील सुप्रसिद्ध लेखिका  डॉ.  योगिनी सातारकर पांडे , उदघाटक लोककवी डॉ. विठ्ठल वाघ , सुप्रसिद्ध साहित्यिक बाबाराव  मुसळे , महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित , ज्येष्ठ कथाकार सुरेश पाचकवडे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते . 
          डॉ. विनय दांदळे यांच्या " आयुर्वेद सर्वांसाठी " या पुस्तकास मिळालेला हा चौथा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आहे , यापूर्वी मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फौंडेशनच्या वतीने उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तसेच हिंगोली येथील समृद्धी प्रकाशन च्या वतीने उत्कृष्ट साहित्य कृती म्हणून संत नामदेव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि अंकुर साहित्य संघ तर्फे देण्यात येणारा संकीर्ण विभागात राज्यस्तरीय अंकुर मराठी वाड्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून डॉ. विनय दांदळे यांचे हे ३४ 
वे पुस्तक असून आतापर्यंत चार राज्यस्तरीय पुरस्काराची मोहोर त्यावर उमटली आहे .

Web Title: Dr. Vinay Dandale Awarded the State Level Glossary Literature Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.