डॉ. पंदेकृविच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिळणार हवामान, तापमानाची महिती ; डिजिटल फलक  लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:42 PM2018-06-17T13:42:04+5:302018-06-17T13:43:45+5:30

अकोला : शेतकरी, नागरिकांना आता दररोज हवामान, तापमानाची माहिती मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यासाठीचे डिजिटल फलक लावले जाणार आहे.

Dr. Weather, temperature information on pdkv main entrance | डॉ. पंदेकृविच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिळणार हवामान, तापमानाची महिती ; डिजिटल फलक  लावणार

डॉ. पंदेकृविच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिळणार हवामान, तापमानाची महिती ; डिजिटल फलक  लावणार

Next
ठळक मुद्देकुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून हवामानाची माहिती देण्याचा निर्णय कृषी विद्यापीठाने घेतला आहे. ही माहिती शेतकºयांना मिळण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात येणार आहे.

अकोला : शेतकरी, नागरिकांना आता दररोज हवामान, तापमानाची माहिती मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यासाठीचे डिजिटल फलक लावले जाणार आहे.
तापमान कमी झाले, वाढले, पाऊस किती झाला, पाऊस कधी येणार अनेकांना ही माहिती चर्चेतून कळते. बरेच जणांना माहिती नसते. विशेष करू न शेतकऱ्यांना बºयाचदा याबाबत माहिती नसते. त्यामुळे शेतकरी अनेकदा हवामानाचा अंदाज न घेता पेरणी करतात, पेरणी केलेल्या पिकांना संरक्षित सिंचनाची सोय असूनही उशीर होतो. याच पृष्ठभूमीवर ही माहिती शेतकºयांना मिळण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून हवामानाची माहिती देण्याचा निर्णय कृषी विद्यापीठाने घेतला आहे.

Web Title: Dr. Weather, temperature information on pdkv main entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.