जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:31+5:302021-04-06T04:17:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांच्या २८ रिक्त जागांंची प्रारुप मतदार यादी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांच्या २८ रिक्त जागांंची प्रारुप मतदार यादी सोमवार, ५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या मतदार यादीवर आक्षेप दाखल करण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे आणि जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समित्यांच्या २८ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत १७ मार्च रोजी दिलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांची प्रारुप मतदार यादी ५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे.
‘या’ ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली प्रारुप मतदार यादी!
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील तहसील कार्यालये, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये याठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांची प्रारुप मतदार यादी प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या अशा आहेत रिक्त १४ जागा!
जिल्हा परिषदेच्या १४ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये दानापूर, अडगाव बु., अकोलखेड, तळेगाव बु., कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदूरा, देगाव, दगडपारवा व शिर्ला या १४ जागांचा समावेश असून, या रिक्त जागांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.