अजगराने केली हरणाची शिकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:12+5:302021-09-25T04:19:12+5:30
कृषी विद्यापीठ परिक्षेत्रात शुक्रवारी महिला मजूर क्षेत्रामध्ये शेतातील गवत कापत असताना त्यांना अजगर दृष्टीस पडला. याबाबत माहिती नितीन ...
कृषी विद्यापीठ परिक्षेत्रात शुक्रवारी महिला मजूर क्षेत्रामध्ये शेतातील गवत कापत असताना त्यांना अजगर दृष्टीस पडला. याबाबत माहिती नितीन इंगळे यांनी सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र कुमार सदाशिव, प्रशांत नागे, सूरज सदाशिव यांनी अजगराला पकडले. ८ फूट लांब, ६ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या अजगराला वन विभागाचे सुरेश गवई अधिकाऱ्यांमार्फत जंगलात सोडण्यात आले. दरम्यान सर्पमित्र सुरज मोहन सदाशिव, सर्पमित्र कुमार सदाशिव, सर्पमित्र प्रशांत नागे, विजय तायडे , राहुल आठोले , योगेश तायडे, रत्नदीप सरकटे, वैभव धुमाळे ,भूषण गावंडे ,सुनील राजूरकर,रितेश भोंबळे प्रफुल सदाशिव, स्वप्निल राजूरकर, अजय हिंगणे आदींनी सहकार्य केले. साप व वन्यजीव जखमी पशुपक्षी आढळल्यास सर्पमित्रांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.