ग्रामीण भागात दारूचा पूर
By admin | Published: July 13, 2017 01:04 AM2017-07-13T01:04:33+5:302017-07-13T01:04:33+5:30
हाता : हाता पोलीस स्टेशनांतर्गत हाता, कारंजा, सागद, नागद, बहादुरा, निंबा, निंबी या परिसरात देशी व गावरान दारू विक्री खुलेआम सुरू राहते, त्यामुळे व्यसनाधीन नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
हाता : हाता पोलीस स्टेशनांतर्गत हाता, कारंजा, सागद, नागद, बहादुरा, निंबा, निंबी या परिसरात देशी व गावरान दारू विक्री खुलेआम सुरू राहते, त्यामुळे व्यसनाधीन नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
हाता गावात दारू विक्री अगदी राजरोसपणे केली जात आहे. हाता गावातील बाजार परिसरात दारू विक्रीवाल्यांनी खुलेआम धंदा सुरू केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक व शाळकरी मुलांना त्रास जाणवत आहे, तसेच दारुड्या पतीमुळे घरोघरी भांडणे उद्भवत असून, गावातील शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. ठाणेदारांनी या अवैध दारू विक्रीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.