जिल्ह्यातील १३१ ठिकाणांहून वाहने जपूनच चालवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:45+5:302021-02-17T04:23:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून भरधाव वेगात वाहने चालविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच ...

Drive carefully from 131 places in the district! | जिल्ह्यातील १३१ ठिकाणांहून वाहने जपूनच चालवा!

जिल्ह्यातील १३१ ठिकाणांहून वाहने जपूनच चालवा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून भरधाव वेगात वाहने चालविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात २०२० या वर्षात शंभरपेक्षा अधिक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यातील सर्वाधिक अपघात हे ‘अपघातप्रवण स्थळ’ म्हणून घोषित केलेल्या १३१ ठिकाणांवर झाले आहेत.

जिल्ह्यातील विविध भागात घडणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीकडून नोंदविण्यात येणाऱ्या निष्कर्षानुसार दर तीन वर्षांनी अपघातप्रवण स्थळ निवडून अपघात रोखण्याकरिता प्रभावी उपाययोजना केल्या जातात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर तसेच अकोट राेड, शहरातील मुख्य मार्ग, शिवणी ते रिधोरा नवीन बायपास, बाळापूर रोड ही अपघातप्रवण स्थळे आहेत.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूकडून वाहनचालकांचे उद्बोधन केले जात आहे. या स्थळांवर अपघातापासून बचावाच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यासह साईन बोर्डदेखील लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनीही स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ ‘ब्लॅक स्पॉट’च नव्हे, तर अन्य ठिकाणच्या रस्त्यांवरही वाहने जपूनच चालवावीत, असे आवाहन केले जात आहे.

‘याठिकाणी गाडी जपून चालवा, येथे तुलनेने अधिक अपघात घडले आहेत. त्यामुळे गाडी जपून चालविणे आवश्यक आहे’, असे फलक लावलेले असतानाही वाहनचालक मात्र सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याने अपघात होत असल्याचे वास्तव आहे.

अपघातप्रवण स्थळांवर दहापेक्षा अधिक बळी

रस्ता सुरक्षा समितीच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यात घोषित केलेल्या अपघातप्रवण स्थळांवर जवळपास ६४ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात १०पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातप्रवण स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील विमानतळ परिसर, बाबूळगाव, बोरगाव मंजू, कुरणखेड, माना कुरुम व मूर्तीजापूरचा समावेश आहे. यासोबतच पातूर घाट, अकोट रोड, अकोट - अंजनगाव रोड, नव्याने झालेल्या अकोला - म्हैसांग रस्त्यावरही सर्वाधिक अपघात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ही स्थळे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

गतवर्षातील अपघातांची संख्या

जानेवारी। १७

फेब्रुवारी १३

मार्च। १५

एप्रिल। ०३

मे। ०१

जून। ०६

जुलै। १४

ऑगस्ट। १२

सप्टेंबर। १७

ऑक्टोबर २१

नोव्हेंबर। १८

डिसेंबर। १७

Web Title: Drive carefully from 131 places in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.