सेवानिवृत्त वाहनचालकासाठी ‘कलेक्टर’ झाले ‘ड्रायव्हर’!
By admin | Published: November 4, 2016 02:18 AM2016-11-04T02:18:15+5:302016-11-04T02:18:15+5:30
सेवानिवृत्तीच्या दिवशी वाहनचालकाच्या कार्याचा केला गौरव.
अकोला, दि. ३- जिल्हाधिकार्यांच्या शासकीय वाहनाचे चालक म्हणून गत ३३ वर्षांपासून सेवा करणारे दिगंबर ठक गुरुवारी सेवानवृत्त झाले. त्यांच्या सेवानवृत्तीच्या दिवशी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ठक यांना वाहनामध्ये मागील बाजूस बसवून स्वत: वाहन चालवित त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनचालक पदावर दिगंबर भगवान ठक गेल्या ३३ वर्षांपासून काम करीत होते. जिल्हाधिकार्यांना शासकीय निवास्थान ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचविणे तसेच जिल्हय़ातील विविध कामांसाठी जिल्हाधिकार्यांच्या दौर्यात शासकीय वाहनाचे चालक म्हणून दिगंबर ठक काम करीत होते. ३३ वर्षांच्या सेवेनंतर गुरुवार, ३ नोव्हेंबर ते वाहनचालक पदाच्या सेवेतून नवृत्त झाले. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक बुलबुले आणि जिल्हाधिकार्यांचे वाहनचालक दिगंबर ठक यांच्या सेवानवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात निरोप सभारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमापूर्वी फुलांनी सजविलेल्या जिल्हाधिकार्यांच्या शासकीय वाहनांमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वाहनचालक दिगंबर ठक यांना वाहनाच्या मागील बाजूस बसविले आणि जिल्हाधिकारी शासकीय निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंंत जिल्हाधिकार्यांनी स्वत: वाहन चालवित ठक यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित निरोप सभारंभाच्या ठिकाणी आणले.
वाहनचालकास वाहनाच्या मागच्या बाजूने बसवून जिल्हाधिकारी स्वत: वाहन चालवित असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी पाहीले. हे दृश्य पाहून सेवानवृत्त वाहनचालकासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ह्यड्रायव्हरह्ण बनल्याचा प्रत्यय आला.
प्रामाणिक काम करण्याचा दिला सल्ला!
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक बुलबुले आणि वाहनचालक दिगंबर ठग यांच्या सेवानवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वाहनचालक ठग आणि सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी बुलबुले यांच्या कार्याचा गौरव केला. कोणतेही काम कमी नसते, असे सांगत प्रत्येक कर्मचारी माझा सहकारी असल्याचे ते म्हणाले. सेवेत काम करताना मी माझे काम किती प्रामाणिकपणे करतो, याबाबतचा विचार करणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपल्हिाधिकारी जी.डब्ल्यू. सुरंजे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.