वाहचालकच करतो रू ग्णांची तपासणी

By admin | Published: May 26, 2014 07:12 PM2014-05-26T19:12:19+5:302014-05-27T19:36:39+5:30

बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केद्रांचे अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने आरोग्य केद्राचा वाहचालकच आता रू ग्णांची तपासणीकरीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

The driver checks for the songs | वाहचालकच करतो रू ग्णांची तपासणी

वाहचालकच करतो रू ग्णांची तपासणी

Next

पिंजर -बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केद्रांचे अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची ओरड होऊ नये म्हणून चक्क आरोग्य केद्राचा वाहचालकच आता रू ग्णांची तपासणीकरीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने यांनी या प्रकाराची गंभीर दखलन घेत चौकशीची मागणी केली आहे. पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्वात मोठे केंद्र आहे.या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. यापैकी दुय्यम अधिकारी बोराखडे मुख्यालयी हजर असतात. मात्र वैद्यकीय अधिकारी सुरेश ढोरे नेहमी गैरहजर राहत असल्याने त्यांचे काम आता चालकाने हाती घेतले आहे. गंभीर असलेल्या रूग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून ॲम्बुलंसची सुवीधा आहे. या ठिकाणी चालकाला फक्त वाहन चालविण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. परंतु पिंजर आरोग्य केंद्रात अजब किस्से घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी झोपले की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. २५ व २६ मे रोजी अधिकार्‍याच्या अनुपस्थित चालकाने अनेक रू ग्ण तपासल्याची माहिती मिळाली आहे. 

Web Title: The driver checks for the songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.