ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:36 IST2020-11-13T10:36:01+5:302020-11-13T10:36:09+5:30
Akola Accident News हरभऱ्याची पेरणी करून घरी येताना भरधाव ट्रॅक्टर अचानक उलटला.

ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच ठार
बाळापूर: नांदखेड टाकळी येथील शेतातून हरभऱ्याची पेरणी करून घरी येताना भरधाव ट्रॅक्टर अचानक उलटला. ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शिवसेनेचे सर्कल प्रमुख दीपक बाबाराव घोगरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने शेतात हरभऱ्याची पेरणी करून चालक गजानन श्रीराम तांबडे हे घरी परत येते होते. दरम्यान, देगाव ते रिधोरा मार्गावरील वळणावर भरधाव ट्रॅक्टर अचानक उलटला. या ट्रॅक्टरखाली दबून चालक गजानन तांबडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली.