चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार गेली नाल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:40+5:302021-07-27T04:19:40+5:30

रोहणखेडनजीक असलेल्या वळण मार्गावर असलेल्या नाल्यात (एमएच ३०, एएफ ५६६४) क्रमांची कार दिसून आली. अकोट तालुक्यातील वरूरजऊळका-रोहणखेड मार्ग हा ...

The driver lost control and the car went into the nala! | चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार गेली नाल्यात!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार गेली नाल्यात!

Next

रोहणखेडनजीक असलेल्या वळण मार्गावर असलेल्या नाल्यात (एमएच ३०, एएफ ५६६४) क्रमांची कार दिसून आली. अकोट तालुक्यातील वरूरजऊळका-रोहणखेड मार्ग हा वळणाचा असून, या मार्गावर दिशादर्शक फलक, गतिरोधकाचा अभाव आहे. त्यामुळेच या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गावानजीक असलेल्या भवानी नाल्यात कार गेल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. (फोटो)

--------------------------

दिशादर्शक फलकाचा अभाव

रोहणखेड मार्गावर वळण जास्त असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या वळणावर गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक लावले नसल्याने वाहनचालकाला रात्री रस्त्याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन या मार्गावर दिशादर्शक फलक व गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: The driver lost control and the car went into the nala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.