रस्त्यावरील धुळीने वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:26+5:302021-07-08T04:14:26+5:30
जि. प. शाळेची इमारत शिकस्त! वाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...
जि. प. शाळेची इमारत शिकस्त!
वाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत शिकस्त झाली असून, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. शिकस्त इमारतीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यावर साचले डबके : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या आठवडी बाजारासह अनेक प्रभागांमधील नाले तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
चिखलगाव सर्कल बनले अवैध धंद्यांचा अड्डा!
चिखलगाव : चिखलगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कापशी रोड, कापशी तलाव, माझोड, गोरेगाव बु., गोरेगाव खु. आदी गावात अवैध धंद्यांना ऊत आला असून याकडे पातूर पोलिसांचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
कवठा येथे पाणीपुरवठा विस्कळीत
कवठा : येथील पाणीपुरवठ्याचा सबमर्सिबल पंप जळाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ग्रामस्थांना घरकुलाच्या बांधकामासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.
ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करा
डोंगरगाव: सध्या कोरोना लसीकरण सुरू असून बहुतांश ग्रामीण भागात लसीकरण उपलब्ध नसल्याने एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायत मासा येथील सरपंच इंदिराताई फाले यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.