दारू पिऊन वाहनचालक तर्राट : काेराेनाकाळातही कारवाईचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:49+5:302021-07-05T04:13:49+5:30
काेराेनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ब्रीथ ॲनालायझरचा वापर पाेलिसांनी बंद केला हाेता, तसेच मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने दारू पिऊन ...
काेराेनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ब्रीथ ॲनालायझरचा वापर पाेलिसांनी बंद केला हाेता, तसेच मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई कशी करावी, असा माेठा पेच पाेलिसांसमाेर हाेता. मात्र, पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अकाेला वाहतूक शाखेने दारू पिऊन वाहन चालिवणाऱ्यांची आराेग्य तपासणी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाइ केली. २०१९ आणि २०२० या दाेन वर्षांपेक्षा २०२१ या सहा महिन्यांत दारू पिऊन वाहन चालिवणाऱ्यांवर अधिक कारवाया झाल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे.
२०१९ २०२० २०२१
जानेवारी ०१ ०१ ०७
फेब्रुवारी ०० ०० ०३
मार्च ०१ ०० ११
एप्रिल ०१ ०१ १६
मे ०० ०० ००
जून ०० ०० ००
जुलै ०० ०० ००
ऑगस्ट ०० ०० ००
सप्टेंबर ०० ०० ००
ऑक्टाेबर ०० ०० ००
नाेव्हेंबर ०० ०० ००
डिसेंबर ०० ०० ००
ब्रीथ ॲनालाझरचा वापर बंद
काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून राज्यातील पाेलीस यंत्रणेने ब्रीथ ॲनालायझरचा वापर बंद केला हाेता. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाईला मर्यादा आलेल्या आहेत. मात्र, अकाेला पाेलिसांनी दारू पिऊन वाहन चालिवणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
काेट
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव आहे. मात्र, काेराेनाचे संकट असल्याने अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पाेलिसांनाही अडचणी निर्माण झाल्या हाेत्या. मात्र, यावर उपाय शाेधत दारू पिणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गत दाेन वर्षांपेक्षा यावर्षीच्या सहा महिन्यांत सर्वाधिक कारवाया झालेल्या आहेत.
जी. श्रीधर,
पाेलीस अधीक्षक, अकाेला