वाहनाची धडक; शालेय विद्यार्थी ठार

By admin | Published: January 30, 2017 03:34 AM2017-01-30T03:34:38+5:302017-01-30T03:34:38+5:30

रिसोड ते लोणार रोडवरील मांगवाडी येथील घटना.

Driving vehicle; School students killed | वाहनाची धडक; शालेय विद्यार्थी ठार

वाहनाची धडक; शालेय विद्यार्थी ठार

Next

रिसोड, दि. २९-भरधाव वेगातील चारचाकी वाहनाची धडक लागून १0 वर्षीय शालेय विद्यार्थी ठार झाला. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास रिसोड ते लोणार रोडवरील मांगवाडी येथे घडली.
अमर शिवाजी चोपडे (वय १0 वर्षे) हा शेताजवळील रस्त्यावर उभा असताना लोणी मार्गाने येत असलेल्या भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने ( एम.एच.३७ आर ९६९६) वाहनाने त्यास जबर धडक दिली. यात त्याला जबर मार लागला. उपचारासाठी जखमी अमरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतक रिसोड येथील आप्पास्वामी प्राथमिक मराठी शाळेमध्ये इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. आई-वडिलास एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृतकाचा मामा विठ्ठल आश्रुजी वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनचालक बालाजी सुरुशे (रा.मांगवाडी) याच्याविरुध्द कलम २७९, ३0४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Driving vehicle; School students killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.