जिल्ह्यातील तापमानात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:08+5:302021-05-31T04:15:08+5:30
अकोला : मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील तापमानात घसरण झाली. रविवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी ...
अकोला : मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील तापमानात घसरण झाली. रविवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नुकसानीचा सर्व्हे करण्याची मागणी
अकोला : मागील दोन दिवस पावसाने ग्रामीण भागात हजेरी लावली. यावेळी जोरदार वारा सुटल्याने केळी, निंबू व फळबागांचे नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गुरांचे लसीकरण लांबले!
अकोला : परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गुरांचे लसीकरण करण्यात येते. काही महिन्यांपूर्वी अनेक गावांतील गुरांना लम्पीची लागण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले होते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष अभियान राबवून लसीकरण करण्यात आले.
तलाठी कार्यालयेच तलाठ्यांच्या प्रतीक्षेत
अकोला : अनेक तलाठी कार्यालयेच तलाठ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
ग्रामीण भागात एसटी बंदच
अकोला : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अद्यापही ग्रामीण भागात बसेस बंद आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे प्रवाशांची संख्या रोडावली आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुटत आहेत.