जिल्ह्यात दमदार पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:23 AM2017-10-11T01:23:33+5:302017-10-11T01:24:25+5:30

अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. 

Drought rain in the district! | जिल्ह्यात दमदार पाऊस!

जिल्ह्यात दमदार पाऊस!

Next
ठळक मुद्देअकोट तालुक्यात नदी, नाल्यांना पूर 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. 
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. पोहरा नाला दुथळी भरून वाहत होता, तर मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. सातपुड्यातसुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पोपटखेड धरणाच्या जलपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद असून, आतापर्यंत ५0२ मी.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अकबरी व इफ्तेखार प्लॉटमध्ये नाल्यातील पाणी घरात घुसले. या ठिकाणी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, तलाठी दिनेश मोहोकार, नरेश रतन व नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार यांनी पाहणी केली. शहरातील जिनगरवाडी, शनवारा, खानापूर वेस आदी भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. 

शिर्ला येथे जोरदार पाऊस
शिला : परिसरात ९ ऑक्टोबर रोजी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसाने सोयाबीन सोंगणीची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे घराच्या उंबरठय़ावर असलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले; मात्र तूर पिकाला पाऊस लाभदायक ठरला आहे. पावसाचा आवेग खूप जास्त असल्याने श्रीकांत पर्वतावरून धबधब्याप्रमाणे  पावसाचा शुभ्रधवल धारा कोसळत होत्या.

बोरगाव परिसरात पावसाची हजेरी
बोरगाव मंजू : परिसरात गत दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कापूस व तूर पिकांना संजीवनी मिळाली आहे. सोयाबीन पीक सोंगणीला असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली, तर शेतकर्‍यांची धांदल उडाली असल्याचे चित्र आहे. 

घरात पाणी शिरल्यामुळे रात्रभर जागरण
खेट्री : येथे सोमवार रोजी दुपारी मुसळधार पाऊस पडला. पावसाचे पाणी येथील रामदास मालोकार यांच्या घरात शिरल्यामुळे घरातील दोन क्विंटल गहू व २0 किलो उडीद व इतर घरगुती साहित्य असे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरात पाणीच पाणीच साचले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रात्रभर जागरण करून रात्र काढावी लागली. अन्न व धान्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई करून देण्याची मागणी रामदास मालोकार यांनी केली आहे.

Web Title: Drought rain in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.