दुष्काळी मदत अन् तूर-हरभरा अनुदानाची आस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:58 PM2018-11-14T12:58:33+5:302018-11-14T13:13:43+5:30
दुष्काळी मदत आणि तूर-हरभरा अनुदान रकमेचा दिलासा केव्हा मिळणार, याबाबतची आस दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना लागली आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांतील पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आली नसून, तूर व हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र शेतमालाची खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले अनुदान जिल्ह्यातील शेतकºयांना अद्याप मिळाले नाही. यासोबतच दुष्काळी परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत आणि तूर-हरभरा अनुदान रकमेचा दिलासा केव्हा मिळणार, याबाबतची आस दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना लागली आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत गत मे अखेरपर्यंत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील आठ खरेदी केंद्रांवर हमी दराने तूर व हरभरा खरेदी करण्यात आली; परंतु तूर व हरभरा विक्रीसाठी शासनाच्या पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या; परंतु तूर व हरभरा खरेदी करण्यात आला नाही, अशा शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय गत १९ जून २०१८ रोजी घेण्यात आला. सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील ४० हजार ९६२ शेतकºयांना अद्याप तूर व हरभरा अनुदान मिळाले नाही, तसेच यावर्षीच्या गत पावसाळ्यात पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली; परंतु दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत आणि तूर व हरभरा अनुदानाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांत पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!
तालुका क्षेत्र (हेक्टर)
अकोला ८६६२३
बार्शीटाकळी ५१५६२
तेल्हारा ५३०३६
बाळापूर ६०५९१
मूर्तिजापूर ६५४७२
...............................................
एकूण ३१७२८४
तालुकानिहाय असे आहेत दुष्काळग्रस्त शेतकरी!
/>तालुका कोरडवाहू बागायती
अकोला ६२७२७ ३००३
बार्शीटाकळी ३५५५३ ५०९३
तेल्हारा १४७०५ १२७८५
बाळापूर २०३०८ १९२०
मूर्तिजापूर ३८६८० ........
....................................................
एकूण १७१९७३ २२८०१