नागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवकांच्या भत्त्यात दुपटीने वाढ

By admin | Published: May 26, 2014 12:56 AM2014-05-26T00:56:00+5:302014-05-26T01:13:37+5:30

होमगार्ड व नागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवकांच्या यांच्या भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली.

Dual increase in the allowance of volunteers in civil defense | नागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवकांच्या भत्त्यात दुपटीने वाढ

नागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवकांच्या भत्त्यात दुपटीने वाढ

Next

अकोला : पोलिस कर्मचार्‍यांची सावली म्हणून वावरणारे आणि त्यांच्याच बरोबरीने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे होमगार्ड यांच्या भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली. १५0 रुपये प्रतिदिवसाच्या मानधनाऐवजी आता ३00 रुपये प्रतिदिवसाप्रमाणे मानधन होमगार्डच्या पदरात पडणार आहे. मानधनात केलेली वाढ समाधानकारक नसली तरी होमगार्ड जवानांना दिलासा देणारी आहे. राज्यामध्ये ३९ हजार ७९२ होमगार्ड जवान कार्यरत आहेत. पोलिसांएवढीच जबाबदारी होमगार्ड जवान प्रामाणिकपणे पार पाडतात. असे असतानाही त्यांच्यासोबत नेहमीच दुजाभाव केला जातो. पोलिस खात्याकडूनही होमगार्डला नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. शासनही होमगार्डच्या समस्यांची दखल घेत नव्हते. अल्प मानधनात होमगार्ड आपली सेवा देत होते. होमगार्ड जवानांनी अनेकदा शासनदरबारी आपल्या समस्या मांडल्या. मानधन वाढवून देण्यासंदर्भातसुद्धा जवानांनी गृहमंत्र्यांकडे मागणी उचलून धरली. कदाचित याच मागणीची दखल घेऊन शासनाने होमगार्ड जवानांना आता १५0 रुपयांच्या मानधनाऐवजी प्रत्येक दिवशी ३00 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच होमगार्ड जवानांना उपहार भत्ता म्हणून १00 रुपये मिळणार आहेत. सध्या हा भत्ता पोलिस आयुक्तालय हद्दीसाठी ५0 रुपये आणि इतर क्षेत्रासाठी २५ रुपये देण्यात येतो. होमगार्ड जवानांच्या कवायत भत्त्यामध्येदेखील वाढ करण्यात आली. कवायत भत्त्यासोबतच, खिसा भत्ता, भोजन भत्ता, धुलाई भत्तासुद्धा वाढविण्यात आला आहे

Web Title: Dual increase in the allowance of volunteers in civil defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.