बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चढविली चादर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:13+5:302021-04-30T04:23:13+5:30

दोन्ही बोअरवेलना पाणी लागल्यास सोफी शाह बाबा या दर्ग्यावर फुलांची चादर चढविण्यात येईल, असे ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद हनिफ ...

Due to abundant water in the borewell, Muslim brothers put sheets on the Dargah! | बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चढविली चादर!

बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चढविली चादर!

Next

दोन्ही बोअरवेलना पाणी लागल्यास सोफी शाह बाबा या दर्ग्यावर फुलांची चादर चढविण्यात येईल, असे ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद हनिफ यांनी कबूल केले होते. त्यानुसार, ही फुलांची चादर चढविण्यात आली. यावेळी सरपंच मंगेश तायडे, मोहम्मद हनिफ भाई, मोहम्मद जाकीर, शेख युनूस, असलम, शेख मतीनभाई आदी मान्यवर उपस्थित होते. बोअरवेल करण्यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष घालून वाॅर्ड क्र.४ मधील खैवाडी आणि वाॅर्ड क्र. ५ मधील देगाव टी पॉइंट येथे दोन बोअरवेल केल्या. या दोन्ही बोअरवेलना मुबलक प्रमाणात पाणी लागले. त्यामुळे आता पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रा.पं. सदस्य सचिन धनोकार, सुनील मानकर, माजी उपसरपंच राजकुमार अवचार, राजू पळसकर, ग्रामपंचायत सदस्य मो. सलीम जमादार, अय्याज साहील, मो. मुजाहिद, हनिफ भाई, डॉ. शे चॉंद, मोहम्मद अफतर ऊर्फ बब्बू ठेकेदार, मुजफ्फर हुसेन, इमरान बेग, ॲड. सुबोध डोंगरे, मनोहर सोनटक्के, डॉ. सोहेल खान, असलम भाई, अंकुश शहाणे, सतीश सरप, शे. मोईन शे. खाजा, सदानंद मानकर, गजानन मानकर, इरफान कुरेशी, शकीलभाई, सुकेश डोंगरे, अजबाराव डोंगरे आदी उपस्थित होते.

फोटो: मेल फोटोत

Web Title: Due to abundant water in the borewell, Muslim brothers put sheets on the Dargah!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.