Corona Efect : सिनेमागृह बंदमुळे रोजची पाच लाखांची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:00 PM2020-03-17T14:00:51+5:302020-03-17T14:01:27+5:30
सिनेमागृह बंद केल्यामुळे रोजची ५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.
अकोला : कोरोना आजाराच्या दहशतीमुळे राज्यातील सिनेमागृहे बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर अकोल्यातील सिनेमागृहे बंद होताच रोजची तब्बल ५ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सिनेमागृह संचालकांनी दिली. सिनेमागृह बंद केल्यामुळे संचालकांचे नुकसान होत असले तरी त्यांच्या सिनेमागृहात कामावर असलेले कर्मचारी तसेच सायकल स्टॅन्डवरील कामगार बेरोजगार झाले आहेत.
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे जगभर दहशत पसरली आहे. प्रत्येक देशात हा आजार हातपाय पसरत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या आजारावर औषध नसल्यामुळे प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे एवढेच काम करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या आजाराला आळा घालण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद केली असून, गर्दी होणार नाही. राज्यातील गर्दी होणाऱ्या ठिकाणांना बंद करण्यात आले असून, यामध्ये कॉल्स, सिनेमागृह तसेच जीमचा समावेश असून, जिल्ह्यातील सिनेमागृह बंद केल्यामुळे रोजची ५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर या ठिकाणी काम करणाऱ्यांवरही बेरोजगारीची कुºहाड कोसळली असून, त्यांच्या हातालाही सध्या काम नसल्याचे वास्तव आहे.