नाफेडच्या खरेदी बंदमुळे मूर्तीजापूर बाजार समितीत शेतमालाचे भाव पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:09 PM2018-06-10T15:09:16+5:302018-06-10T15:09:16+5:30

मूर्तीजापूर :  नाफेड कडून हजारो क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला असून त्यांच्या मालाचे पैसे अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने तो नाफेडच्या अॉनलाईन जाचामुळे हतबल झाला आहे. नाफेडने अचानक खरेदी बंद केली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक वाढली आहे, त्यामुळे पडलेल्या भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.

Due to the closure of the purchase of Nafed, the prices of the commodity dropped | नाफेडच्या खरेदी बंदमुळे मूर्तीजापूर बाजार समितीत शेतमालाचे भाव पडले

नाफेडच्या खरेदी बंदमुळे मूर्तीजापूर बाजार समितीत शेतमालाचे भाव पडले

Next
ठळक मुद्दे तुर खरेदी १५ मे पासून व हरभरा खरेदी २९ मे पासून अचानक बंद केल्याने ७० टक्के शेतकऱ्याचा माल घरी तसाच पडून आहे.भाव प्रचंड कोसळले असून तुर तीन हजार पाचशे रुपये आणि हरभरा तीन हजार दोनशे भावाने खरेदी करण्यात येत आहे.पेरणी पुर्व मशागतीसाठी आणि मुलाच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपला उर्वरित शेती माल बेभाव विकण्याची पाळी आली आहे.


- संजय उमक
मूर्तीजापूर :  नाफेड कडून हजारो क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला असून त्यांच्या मालाचे पैसे अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने तो नाफेडच्या अॉनलाईन जाचामुळे हतबल झाला आहे. नाफेडने अचानक खरेदी बंद केली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक वाढली आहे, त्यामुळे पडलेल्या भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.
नाफेडने आतापर्यंत ५४ हजार क्विंटल तुर तर चार हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. मार्च २७ पर्यंत चुकारे केले आहे, एप्रिल, मे मध्ये खरेदी केलेल्या मालाचे चुकारे अजूनही झालेले नाही. तुर खरेदी १५ मे पासून व हरभरा खरेदी २९ मे पासून अचानक बंद केल्याने ७० टक्के शेतकऱ्याचा माल घरी तसाच पडून आहे.
नाफेडकडू तुर पाच हजार चारशे पन्नास रुपये व हरभरा चार हजार चारशे पन्नास रुपये भावाने खरेदी करण्यात आला, त्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव प्रचंड कोसळले असून तुर तीन हजार पाचशे रुपये आणि हरभरा तीन हजार दोनशे भावाने खरेदी करण्यात येत आहे. संपूर्ण व्यवहार शेतीच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर पेरणीचे दिवस तोंडावर आल्याने तसेच पेरणी पुर्व मशागतीसाठी आणि मुलाच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपला उर्वरित शेती माल बेभाव विकण्याची पाळी आली आहे.
सात तारखेपर्यंत सर्व उर्वरित चुकारे व सात तारखेला हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती परंतु ना खरेदी केंद्र सुरू झाले ना शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसा जमा झाला. फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन करीत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहेत. नाफेड खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांनी अॉनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाच्या धर्तीवर प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने ठरवले असून चुकाऱ्यासोबतच अनुदानाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


तालूक्यातील धान्य गोडाऊन फुल
बुलढाणा अर्बन व वखार महामंडळाचे संपुर्ण गोडाऊन फुल झाले असून स्थानिक शेतकऱ्यांना धन्य ठेवायला जागाच उरली नाही अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, मलकापूर येथील व्यापाऱ्यांनी गोडाऊनवर कब्जा केल्याने तालुक्यातील गोडाऊन तुडुंब भरले आहे, नाफेडची खरेदी सूर न होण्या मागे हे सुध्दा एक कारण आम्ही खरेदी केलेला माल ठेवायचा कुठे असा प्रती प्रश्न नाफेडकडू करण्यात आला आहे. 
 


चुकारे न होणे, खरेदी करण्यासाठी विविध प्रकारचे अडथळे निर्माण होणे, शासन खरेदीसाठी तारीख वारंवार वाढवून देत असतात खरेदी सुरू करण्यात करण्यात येत नाही अर्थात सदर यंत्रणेवर जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने ही यंत्रणा अपयशी आणि कुचकामी ठरली आहे.
डॉ. अमित कावरे
शेतकरी तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तीजापूर

हरभरा, तुर पेरा किती, मालाची आवक किती असणार त्यासाठी बारदाण किती लागणार व खरेदी केंद्रे किती असावीत हे सर्व माहित असताना शासनाने ठरवून व नियोजनबद्ध काहीच केले नाही.
खरा उद्देश शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा असता तर शासनासाठी नियोजन करणे ही मोठी गोष्ट नाही, नाफेड खरेदी बंद झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील मालाचे भाव प्रचंड प्रमाणात पडले आहेत खरीप हंगाम पुर्व तयारी सुरू असताना नाफेडचे चुकारे नाहीत, शेवटी शेतकऱ्यांना आपला माल पडत्या भावाने विकावा लागणार..
मनोज तायडे
संयोजक शेतकरी जागर मंच

 मूर्तीजापूर केंद्रावर आतापर्यंत नाफेडने ५४हजार क्विंटल तुर तर ४हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. यासंदर्भात शासनाकडे अॉनलाईन पोर्टल सूर करण्यासाठी आम्ही पत्र पाठविले आहे जेणेकरून पोर्टल सूर होऊन शेतकऱ्यांचे चुकारे त्यांच्या खात्यात अॉनलाईन जमा होतील परंतु शासनाकडून त्यावर अद्याप काहीही उत्तर मिळाले नाही.
डी. एन. मुळे
व्यवस्थापक खरेदी विक्री संघ, मूर्तीजापूर

नाफेडची खरेदी बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुर्वीच्या तुलनेत मालाची आवक वाढली रोज एक हजार क्विंटल खरेदी होत होती मात्र आता ती अडीच हजार क्विंटलचे वर गेली आहे.
रितेश मडघे
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तीजापूर

 

Web Title: Due to the closure of the purchase of Nafed, the prices of the commodity dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.