तेल्हारा ते जळगाव बससेवा बंदमुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:42+5:302021-02-09T04:21:42+5:30
बस नसल्याने प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तेल्हारा तालुक्यातून दररोज प्रवासी, व्यापारी तसेच विविध शासकीय, निमशासकीय ...
बस नसल्याने प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तेल्हारा तालुक्यातून दररोज प्रवासी, व्यापारी तसेच विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, आयटीआयचे विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. परंतु तेल्हारा आगारातून जळगाव व संग्रामपूरसाठी एकही बस सोडण्यात येत नाही. याबाबत प्रवासी व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जळगाव जामोद रोडचे काम सुरू असून, रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे लांब पल्ल्याची जळगाव जामोद बसही बंद आहे. तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी माळेगाव दानापूरपर्यंत बसेस सुरू आहेत.
काकनवाडा जवळ रस्त्याच्या आजूबाजूला गिट्टीचे ढीग असल्याने बस बंद करण्यात आली. बस सुरू व्हावी, ट्रायल बस पाठवून सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने बस सेवा सुरू करणे शक्य नाही.
वानरे, आगार व्यवस्थापक
तेल्हारा, जळगाव बससेवा बंद असल्यामुळे खासगी वाहनचालक विद्यार्थ्यांची व प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन बस सेवा सुरू करावी.
शुभम सोनटक्के,
विद्यार्थी आयटीआय, संग्रामपूर