अकोला जिल्हय़ात दुष्काळाचे सावट

By admin | Published: June 30, 2014 01:12 AM2014-06-30T01:12:13+5:302014-06-30T01:26:05+5:30

अकोला जिल्हय़ात टंचाई परिस्थिती: उपाययोजनांसाठी बोलावली बैठक.

Due to drought in Akola district | अकोला जिल्हय़ात दुष्काळाचे सावट

अकोला जिल्हय़ात दुष्काळाचे सावट

Next

संतोष येलकर / अकोला
पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून, जिल्हय़ात कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मान्सून लांबल्याने जिल्हय़ातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर उ पाययोजना करावयाच्या आकस्मिक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी येत्या ५ जुलै रोजी बैठक बोलावली आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात आहे; मात्र अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. पावसाने दडी मारल्याने जिल्हय़ात खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असली तरी, पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने जिल्हय़ात खरीप पेरण्यांना अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यात अतवृष्टीमुळे मूग, उडिदाचे पीक बुडाले, तर यावर्षी मान्सून लांबल्याने पेरणीचा कालावधी निघून जात असल्याच्या स्थितीत यंदाही मूग, उडिदाचे पीक येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस नसल्याच्या परिस्थितीत खोळंबलेल्या पेरण्या आणि शे तीची कामे बंद असल्याने शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याची स्थिती आहे. यासोबतच जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ातही कमालीची घट होत असून, पाणीटंचाईचा प्रश्नही तीव्र होत आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास जिल्हय़ात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून, पावसाअभावी जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याचे चित्र आहे.
मान्सून लांबल्याने गेल्या २७ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जिल्हाधिकार्‍यांची ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सह्ण घेऊन संभाव्य टंचाई परिस्थि ती हाताळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने मान्सून लांबल्यने जिल्हय़ातील संभाव्य टंचाई परिस्थिती व करावयाच्या आकस्मिक उ पाययोजनांसाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हय़ातील संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक बोलावली आहे.
२२पावसाअभावी जिल्हय़ात रखडलेल्या खरीप पेरण्या, बियाणे व खतांचा साठा, पाणीटंचाईची स्थिती, जनावरांसाठी उपलब्ध चारा व इतर बाबींचा आढावा आणि टंचाई परिस्थितीवर करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: Due to drought in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.