‘एमपीजे’ने दिले धरणे
By Admin | Published: November 18, 2016 02:05 AM2016-11-18T02:05:50+5:302016-11-18T02:05:50+5:30
सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी.
अकोला, दि. १७- सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, मुस्लिमांना आरक्षण लागू करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी मुव्हमेंट फॉर पीस अँन्ड जस्टिस (एमपीजे) संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
सच्चर समिती व महमुदुर्ररहमान समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, मुस्लिमांना आरक्षण लागू करण्यात यावे, अल्पसंख्यांकाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी ह्यएमपीजेह्णच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात एमपीजे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अतीकूर रहेमान यांच्यासह एमपीजे संघटना, कुल जमाती तंजीम, जन सत्याग्रह संघटना, जनजागृती फाउंडेशन, ऑल इंडिया कॉमी तंजीम, मुस्लीम युवा मंच, सहारा वेलफेअर सोसायटी, राष्ट्रीय अल्पसंख्यांक सोसायटी, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, ओबीसी ऑर्गनायझेशन, जमातअत-ए-इस्लामी हिंद, मानव सेवा समिती, अली फाउंडेशन, उर्दू शिक्षक आघाडी, ताज ग्रुप, अमन सोसायटी व खिदमत अल्पसंख्याक सोसायटी इत्यादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.