दुषीत पाणी, तापत्या उन्हामुळे प्रशिक्षणार्थी पाेलिसांची प्रकृती बिघडली

By सचिन राऊत | Published: March 29, 2024 09:54 PM2024-03-29T21:54:25+5:302024-03-29T21:56:11+5:30

पाेलिस प्रशिक्षण केंद्रातील १५ पेक्षा अधिक प्रशिक्षनार्थींचा समावेश, रुग्णालयात करण्यात आले उपचार

Due to polluted water, hot sun, the condition of police trainees deteriorated | दुषीत पाणी, तापत्या उन्हामुळे प्रशिक्षणार्थी पाेलिसांची प्रकृती बिघडली

दुषीत पाणी, तापत्या उन्हामुळे प्रशिक्षणार्थी पाेलिसांची प्रकृती बिघडली

अकाेला : गडंकी परिसरातील पाेलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पाेलिस कर्मचाऱ्यांना दुषीत पाणी व कडक उन्हामुळे त्रास झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुमारे १५ पेक्षा अधिक महिला प्रशिक्षणार्थी पाेलिसांना दुषीत पाणी व उन्हामुळे त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात ५० पेक्षा अधिक महिला प्रशिक्षणार्थी पोलिस प्रशिक्षणासाठी प्रवेशीत आहेत. राज्यातील विविध जिल्हयातील महिला प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली आहे. यामधील १५ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी पाेलिसांना दुषीत पाण्यामूळे त्रास झाल्याची घटना घडली. त्यामूळे प्रशासनाने या प्रशिक्षणार्थींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या महिला प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती दुषीत पाणी प्यायल्यामुळे अचानक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. कडक उन्ह, प्रशिक्षण व पाणी या तीनही कारणांमूळे महिला प्रशिक्षणार्थींच्या आरोग्यावर परिणाम झाला अशी माहीती समाेर आली आहे. या महिला पाेलिसांना मळमळ आणि उलट्या झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील बहुतांश महिला पाेलिसांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर काहींवर कीरकाेळ प्रमाणात उपचार सुरु आहेत.

आ. सावरकरांनी गृहमंत्री, पालकमंत्र्यांना दिली माहीती

पाेलिस प्रशिक्षण केंद्रातील काही प्रशिक्षणार्थी पाेलिसांना दुषीत पाणी व उन्हामूळे त्रास झाल्याची माहीती आ. रणधीर सावरकर यांनी तातडीने गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली. फडणवीस व विखे पाटील यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसह सर्वांची आराेग्य तपासणी तसेच याेग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले. यासाेबतच शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययाेजना करण्याच्या सुचना दिल्या.

Web Title: Due to polluted water, hot sun, the condition of police trainees deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.