अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 10:38 AM2021-03-25T10:38:25+5:302021-03-25T10:38:43+5:30

Akola APMC अवकाळी पावसामुळे बाजार समितीत ५००-६०० क्विंटल मालाची आवक घटली आहे.

Due to untimely rains, the Akola market committee declined | अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत आवक घटली

अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत आवक घटली

Next

अकोला : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा परिणाम बाजार समितीत पहावयास मिळाला. अवकाळी पावसामुळे बाजार समितीत ५००-६०० क्विंटल मालाची आवक घटली आहे. मालाची मागणी असल्याने दरात वाढ होत आहे. हरभरा, सोयाबीनचे दर वाढले असून तुरीचे भाव स्थिर आहे.शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन ३००० ते ३५०० क्विंटल मालाची आवक होत असते. दरही चांगले मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला माल येथे विक्रीस घेऊन येत आहे. गहू, हरभरा काढणीचा हंगाम सुरू असून बाजार समितीत आवकही वाढली होती; मात्र अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने गहू, हरभरा भिजला. गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळीचा परिणाम बाजार समितीत येणाऱ्या मालावर झाला. तीन-चार दिवस शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन न आल्याने आवक ५०० ते ६०० क्विंटलने घटली. तर बाजार समितीत माल ठेवण्याची व्यवस्था असल्याने भिजला नाही.

 

बाजार समितीत ५०० क्विंटलच्या जवळपास आवक घटली आहे. मार्च महिन्याचा शेवट व सुट्या बघता दोन दिवस आवक वाढण्याची शक्यता आहे. हरभरा, सोयाबीनला चांगला दर मिळत आहे.

- शिरीष धोत्रे, सभापती, कृउबास, अकोला

 

जिल्ह्यातील वातावरण अद्रक पिकाला पोषक नसल्याने मालाचा आकार लहान राहतो. बाजार समितीत औरंगाबाद येथून अद्रकचा माल येतो. तेथील माल जाडा पंजेदार असल्याने त्याच अद्रकला जास्त पसंती आहे. सद्यस्थितीत अद्रकला १५ ते २० रुपये किलो ठोक भाव मिळत आहे.

- विशाल बालचंदाणी, अडत दुकानदार

 

हरभरा, गव्हाची आवक कमी झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेला माल अद्याप बाजार समितीत आला नाही. मागील चांगल्या मालाची आवक सुरू आहे. सोयाबीनची भाव पाहून आवक आहे.

- केशव कळमकर, व्यापारी

 

मंगळवारी झालेली आवक

हरभरा

२४८१ क्विंटल

गहू

४९२ क्विंटल

सोयाबीन

२१८१ क्विंटल

तूर

७४६ क्विंटल

 

शेतमालाचे बाजार भाव (सरासरी)

हरभरा

४६५० प्रति क्विंटल

गहू

१६७५ प्रति क्विंटल

सोयाबीन

५३५० प्रति क्विंटल

तूर

६५०० प्रति क्विंटल

Web Title: Due to untimely rains, the Akola market committee declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.