‘वंचित’चे ‘डफली बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:34 PM2020-08-12T16:34:09+5:302020-08-12T16:39:57+5:30

बुधवारी अकोल्यात वेगवेगळ्या ठिकाणी ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

‘Duffly Bajao’ movement of ‘Vanchit Bahujan Aghadi' in Akola | ‘वंचित’चे ‘डफली बजाओ’ आंदोलन

‘वंचित’चे ‘डफली बजाओ’ आंदोलन

googlenewsNext

अकोला : कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविणयासाठी देशभरात लागु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तत्काळ लॉकडाऊन हटवावा, एसटी आणि शहर बस सेवा सुरु करावी, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी अकोल्यात वेगवेगळ्या ठिकाणी ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे टपरीवाले, फेरीवाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळावरही मोठे संकट आलेंआहे. दोन महिन्यांमपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. लॉकडाडाऊनमुळे गोरगरीबांचे जगणे असह्य झाले असल्याने हा लॉकडाऊन हटवून परिवहन सेवा सुरु कराव्या, या मागण्यांसाठी अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘डफली बजाओ’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार, अकोला शहरात मध्यवर्ती बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडक खुले नाट्यगृह, महानगर पालिका आणि एसटीचे विभागीय कार्यालय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Web Title: ‘Duffly Bajao’ movement of ‘Vanchit Bahujan Aghadi' in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.