खोदतळ्य़ांचा निधी पाण्यात!
By admin | Published: November 1, 2016 02:05 AM2016-11-01T02:05:14+5:302016-11-01T02:05:14+5:30
लघुसिंचन विभागाची तांत्रिक मान्यता; निधी जलयुक्त शिवारचा
अकोला, दि. ३१-आधीच भ्रष्टाचाराने गेल्या सात-आठ वर्षात जेरीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने खोदतळ्य़ांच्या कामांना तांत्रिक मंजुरी देताना शासनाच्या तांत्रिक व आर्थिक मापदंडांना धाब्यावर बसवले आहे. त्या मापदंडानुसार नाल्याच्या प्रवाहात खोदतळे न घेता ते चक्क जमिनीवर बांधून १५ कामांचे तीन कोटी ५३ लाख रुपये पाण्यात पर्यायाने भ्रष्टाचारात गमावण्याचे नियोजन झाल्याचे यावरून दिसून येत आहे.
शासनाच्या नियोजन विभागाने २0 जानेवारी २0१0 रोजीच्या आदेशात मृदसंधारण व जलसंधारणाच्या विविध उपचारासाठी तांत्रिक, आर्थिक मापदंडाचा सुधारित गोषवारा दिला. त्यामध्ये खोदतळे म्हणजे पाण्यात बुडणारे खोदतळे (डग आऊट संकन पाँड) या उपचारासाठी ३0 : २0 : ३ मीटर कामासाठी आर्थिक मापदंडही ठरले आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने शासनाचा आराखडा डावलून १00 : १00 : ३ मीटर आकाराच्या खोदतळ्य़ांच्या अंदाजपत्रकांना २५ लाख रुपयांच्या खर्च र्मयादेत तांत्रिक मान्यता दिली; तसेच निविदा प्रक्रियाही राबवली. जिल्ह्यातील १५ खोदतळ्य़ांसाठी तीन कोटी ५३ लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली.
खोदतळ्य़ाची ही कामे नाला तळाशी न घेता जमिनीवर होणार आहेत. हा प्रकार शासनाचे आदेश डावलून निधी पाण्यात घालवणारा ठरत आहे.