शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेचा कालावधी वाढविला जाईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:39 PM2018-10-10T16:39:34+5:302018-10-10T16:39:52+5:30
अकोला: राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक ांचा मोबदला हमीभावापेक्षा कमी न देण्यासोबतच सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्याच्या मुद्यावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रदीर्घ चर्चा केली.
अकोला: राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक ांचा मोबदला हमीभावापेक्षा कमी न देण्यासोबतच सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्याच्या मुद्यावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यासह हमीभावाच्या संदर्भात गोंधळ उडणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांनी दिले.
शासनाने सोयाबीन, उडीद, मुगाच्या खरेदीसाठी तारीख निश्चित करून जिल्हावार, तालुक्यातील बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू केले. ज्या दिवशी खरेदी केंद्र सुरू केले, त्या दिवसांपासून ते आजपर्यंत बहुतांश केंद्रांवर शेतमालाची खरेदीच सुरू झाली नसल्याची परिस्थिती आहे. याशिवाय बाजार समित्यांमधील दर हमीभावापेक्षाही कमी झाल्याचे चित्र समोर आले. हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी झाल्यास शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याच्या मुद्यावर खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री ना. सुभाष देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शेतमालाची आॅनलाइन नोंदणी व खरेदी प्रक्रियेत झालेला विलंब लक्षात घेता खरेदीचा कालावधी वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आवश्यक सूचना क्षेत्रीय स्तरावर निर्गमित करण्यात येतील, असे सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले.