कोरोना काळात लहान मुले झाली ‘मोटू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:55+5:302021-07-04T04:13:55+5:30

वजन वाढले, कारण... कारोना काळात मैदानी खेळ खेळणे बंद झाले आहे. त्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम बंद झाला. इनडोअर गेम्स ...

During the Corona period, children became 'fat'! | कोरोना काळात लहान मुले झाली ‘मोटू’!

कोरोना काळात लहान मुले झाली ‘मोटू’!

Next

वजन वाढले, कारण...

कारोना काळात मैदानी खेळ खेळणे बंद झाले आहे. त्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम बंद झाला.

इनडोअर गेम्स प्रामुख्याने बैठे खेळ असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची कुठल्याच प्रकारची हालचाल होत नाही.

शिवाय, मोबाइलवरील स्क्रीन टाइम वाढल्यानेही एकाच जागी बसून राहण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, स्थूलपणा वाढला.

खानपानाचेही गणित बिघडल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवत असल्याचे चित्र आहे.

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

सध्या काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आवश्यक सुरक्षा साधणांचा वापर करून मुलांचा व्यायाम होईल, असे खेळ खेळणे आवश्यक आहे. (उदा. बॅडमिंटन)

मोबाइलवरील व्हिडिओ गेम्स आणि कार्टून व्हिडिओ बघण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक आहे. परिणामी, मुले एकाच जागी जास्त काळ बसून राहणार नाहीत.

या सर्व बाबींसोबतच मुलांच्या खानपानाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना पौष्टिक आहार दिल्यास त्यांचे आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल.

लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात...

कोरोनाच्या काळात मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. परिणामी, बहुतांश मुले एकाच जागी बसून राहत असल्याने त्यांच्या शरीराला आवश्यक व्यायाम मिळत नाही. परिणामी, मुलांमध्ये काही प्रमाणात स्थूलपणाच्या समस्या दिसून येत आहेत. पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.

- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला

मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत

शाळा बंद असल्याने मुलांचा अभ्यास मोबाइलवरच होतो, मात्र अभ्यास झाल्यानंतरही मुले मोबाइल सोडत नाहीत. मोबाइल सोडला, तर टीव्ही बघतात. कोरोनामुळे त्यांना बाहेर पाठविणेही शक्य नाही.

- योगेश पाटील, पालक

Web Title: During the Corona period, children became 'fat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.